Tag: खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...