Tag: खंडाळा
वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...
वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...
दादा कोंडके आणि सेन्सॉरची कैची
दादा कोंडकेंच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद आणि गीते यांमुळे सेन्सॉरची कैची चालायची. त्यावर दादा अफलातून युक्तिवाद करून एकेक कट रद्द करून घेण्यासाठी तुफान आवेशाने लढायचे. दादांच्या युक्तिवादापुढे तत्कालीन सेन्सॉरवालेही नि:शब्द होत...