करजावडेवाडी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पोफळी गावातील गवळी-धनगर या समाजाची वस्ती आहे. करजावडेवाडीला मोठी परंपरा आहे व ती बाबीबाईपासून सुरू होते. बाबीबाई लक्ष्मण ढेबे हिचे सासर तळसरजवळील डेरवण हे गाव आहे. ते गाव मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणकडून गोव्याकडे जाताना पंचवीस किलोमीटरवर लागते. गवळी-धनगर समाज गावातील डोंगरमाथ्यावर राहत आला आहे...