Home Tags केसरबाई केरकर

Tag: केसरबाई केरकर

भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते...

तुम्हां तो शंकर सुखकर हो…

पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ," गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही...”