अकोला हे शहर मोर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा उपयोग आक्रमण करणाऱ्या शत्रूविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाची फळी असा होई, त्या काळची ही गोष्ट आहे. म्हणूनच मोर्णा नदीच्या पश्चिमेला आसदगडाची निर्मिती होऊन, त्याला लगत नागरी वस्त्या निर्माण झाल्या. अकोला शहराचा निश्चित कार्यकाल सांगता येत नाही. परंतु एक आख्यायिका प्रचलित आहे. अकोला शहराची भरभराट मोर्णेच्या साक्षीने झाली आहे. मोर्णा नदी ही विशेषत: जुन्या अकोल्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती...