कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट' त्यांचा अमृत महोत्सव 2020 साली साजरा करत आहे. महात्मा गांधींनी 'कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट' या संस्थेची स्थापना 1945 साली केली. जनतेने स्वयंस्फूर्तीने कस्तुरबांच्या स्मरणार्थ निधी गोळा करून, तो गांधीजींना अर्पण केला. त्यातून तो ट्रस्ट निर्माण झाला.