दोनशे वर्षांपूर्वीचा अमेरिकन हेन्री डेव्हिड थोरो, शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्गा भागवत आणि आजचा प्रल्हाद जाधव यांच्यात नाते काय आहे? थोरो हा जगद्विख्यात विचारवंत व ललित लेखक आहे. त्याने जगभर अनेक थोरामोठ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, टॉलस्टॉय इत्यादींचा समावेश होतो. त्याने सविनय कायदेभंगाचे तत्त्व प्रथम मांडले.