भारतीय संगीतात शेकडो प्रकार गायले आणि वाजवले जातात; किंबहुना गाण्यासाठी भारतात निमित्तच हवे असते. भारतीय चित्रपटांबरोबर चित्रपटगीतांचे एक वेगळे मोठे विश्व तयार झाले आहे. ती संगीतकार, गायक आणि त्यांचे चाहते अशी दुनिया आहे. हिंदी चित्रपट गाण्यांमध्ये हटके आणि गाण्यांचा सीझनल प्रकार म्हणजे देशभक्तिपर गीते. जयंत टिळक यांनी काही निवडक देशभक्तिपर गाण्यांचा उत्कट आढावा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने घेतला आहे. ते लिहितात - संगीतामध्ये माणसाच्याच काय, पण प्राण्यांच्याही भावना चेतवू शकण्याची ताकद आहे. अशी सुरुवात करून टिळक म्हणतात- मात्र एका गाण्याविषयी लिहिलं नाही तर चित्रपट संगीतविषयक सर्व लेखन अपुरं ठरेल. ते गीत आहे - ऐ मेरे वतन के लोगो... त्याच गीताची ही कहाणी...