Tag: ए.जी. हायस्कूल
मनोज पवार यांचा स्मशानातील वाढदिवस !
दापोलीचे पत्रकार मनोज पवार यांनी त्यांचा वाढदिवस स्मशानात करण्याचा उपक्रम सलग पंचवीस वर्षे राबवला ! ते मध्यरात्रीच्या सुमारास तथाकथित भुताखेतांना न घाबरता स्मशानात जात व तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत. कधी त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असत. पण तो मुख्यत: सणकीत केलेला एकांडा पराक्रम होता...
भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)
भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...
आल्फ्रेड गॅडने आणि त्यांचे दापोलीतील एकशेसदतीस वर्षांचे ए.जी. हायस्कूल
अल्फ्रेड गॅडने हे दापोलीला मिशनरी म्हणून 1875-76 साली आलेली स्कॉटिश व्यक्ती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांनी कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोली येथे ए.जी. हायस्कूलच्या रूपात 1880 मध्ये केली. गॅडने यांनी प्राचार्य म्हणून जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षे ए.जी. हायस्कूलचे प्राचार्यपद सांभाळले. गॅडने अनाथ मुलांचेही वाली झाले…