मुले सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळात सहसा शाळेमध्ये असतात, परंतु कोरोनामुळे ती घराघरांत बंदिवान झाली आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सह्याद्री वाहिनीने शाळा आणली आहे. पण ती शाळा दिलखुलास, हसरी, खेळकर आहे आणि मुले शाळेमध्ये मौजमजेत अभ्यास करत आहेत असे दृश्य पालकांना पाहण्यास मिळते.