इंदुताई पाटणकर व त्यांचे पती बाबूजी ऊर्फ विजय हे दोघेही रोजनिशी लिहून ठेवत. ती दोघे चळवळीनिमित्त एकमेकांपासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्यात नेहमी पत्रव्यवहार असे. तसेच मायलेकांचाही पत्रव्यवहार होत होता. त्यांचा लेक भारत पाटणकर. तो संपूर्ण पत्रव्यवहार भारत यांनी सांभाळून ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांची आई ‘क्रांतिवीरांगना इंदुताई’ असे एक पुस्तक लिहिले. पुस्तक असे लिहिले, की जणू काही त्या स्वतः वाचकांशी बोलत आहेत...