Home Tags आप्पासाहेब पटवर्धन

Tag: आप्पासाहेब पटवर्धन

शिरोड्याचे वि.स. खांडेकर संग्रहालय (V S Khandekar memorial at Shiroda in Konkan)

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि.स. खांडेकर यांच्या नावाचे प्रेक्षणीय स्मृती संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘शिरोडा’ या गावी आहे. ते गाव वेंगुर्ला तालुक्यात समुद्रकाठी वसले आहे. गांधीजींनी केलेल्या 1930 सालच्या मार्च-एप्रिल महिन्यातील मिठाच्या सत्याग्रहानंतर, मे 1930 मध्ये त्याच धर्तीवर परंतु काहीसा वेगळा आणि काकणभर अधिक उग्र स्वरूपाचा मिठाचा सत्याग्रह शिरोडा येथे झाला होता ! त्या सत्याग्रहाचे नेते ‘कोकणचे गांधी’ रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सीताराम पुरुषोत्तम अर्थात आप्पासाहेब पटवर्धन हे होते. त्यात त्या गावच्या अनेकांना बंदिवासाची शिक्षाही भोगावी लागली होती...

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...