Tag: आणीबाणी
आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...
कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)
अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...
कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन
दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...
कोबाड गांधी यांची स्वातंत्र्य गाथा
‘डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला मोठा नक्षलवादी नेता’ अशी प्रतिमा असलेल्या कोबाड गांधी यांचे 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे आत्मकथन म्हणजे एका हुशार व प्रामाणिक माणसाची ध्येयवादी वास्तवदर्शी कहाणी आहे !