मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात...
कोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत...