अशोक लिंबेकर यांचे लेखन व्यापकत्व धारण करत आहे. त्याची झलक त्यांच्या ‘वय कोवळे उन्हाचे' या ललित लेखसंग्रहातून पाहण्यास मिळते. ते मलपृष्ठावर लिहितात, लहान मुलाच्या निरागस डोळ्यांनी पाहिलेले ते गाव, रान-शिवार, निसर्ग आणि त्यातील अनेक घटक हा या लेखांचा विषय आहे...