अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय बनवले व त्यांच्या पूर्ततेकडे वाटचाल करू लागला! त्यातून उभे राहिले नगरचे ‘स्नेहालय’ व संलग्न संस्था यांचे साम्राज्य...