अनुपमा बोरकर सर्वसाधारण वृद्धांपेक्षा अगदी वेगळे जीवन जगतात. त्यांनी बौद्ध धर्मातील अनागारिका जीवनपद्धत स्वीकारली आहे. वास्तविक ते बौद्ध भिक्षूपदाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. म्हणजे श्रमनेर व उपसंपदा ही पुढील दोन पावले उचलली की साधक भिक्षु पदास पोचतो. अर्थात ती दोन पावले अनेक वर्षांच्या साधनेची असतात...