Tag: हुबळी
कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !
छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !