सातारा
Tag: सातारा
ज्याचा त्याचा विठोबा
‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...
आदर्श मोठे – विकसनशील छोट्यांसाठी
मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तालुक्याच्या शहराचा मूळचा रहिवासी. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील एकसळ नावाच्या छोट्याशा खेडेगावात 1992पासून माझे स्थायिक होणे हा केवळ...