Home Tags श्रीराम मंदिर

Tag: श्रीराम मंदिर

सर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव

एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...

फलटणचे श्रीराम मंदिर

फलटणचे श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे...

फलटणचे जब्रेश्वर मंदिर

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...

करगणीचे श्रीराम मंदिर (ShreeRam Temple of Kargani)

करगणीचे श्रीराम मंदिर हेमाडपंथी असून ते मूळ महादेव मंदिर आहे. आख्यायिकेनुसार, ‘श्रीरामांनी वनवासातील भ्रमंतीदरम्यान त्याठिकाणी वास्तव्य केले होते. श्रीशंकरांनी लक्ष्मणाला खड्ग आणि आत्मलिंग जिथे दिले, त्या जागी त्याने आत्मलिंगाची स्थापना केली, ते हे मंदिर.’ ग्रामस्थांच्या वतीने त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1975 साली करण्यात आला. त्या वेळी गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या…

इंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)

इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...

समर्थ रामदासांची स्थाने (Saint Ramdas left footprints at many a places)

समर्थ रामदास यांचे प्रभू रामचंद्र हे परमदैवत; तसेच, रामदास हे हनुमानाचे परमभक्त. समर्थांच्या जीवनाशी निगडित महाराष्ट्रातील काही स्थाने...