Tag: विष्णू अवतार
अश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण !
भारतीय लोकांना अठरा पुराणे ठाऊक आहेत. त्या अठरांत कूर्म आणि वराह या नावांची प्राण्यांना उद्देशून दोन पुराणे आहेत. ते विष्णूचे अवतार. मात्र घोडा हा माणसाचा जुन्यातील पाळीव प्राणी आणि त्याचे महत्त्व असूनदेखील त्याच्या नावाने एखादे पुराण नाही कारण विष्णूने अश्वावतार घेतला नव्हता ! मात्र अश्वपरीक्षा नावाचे एक जुने पुस्तक वाचण्यास मिळाले आणि पुराणाची उणीव भरून निघाली. घोड्याला संस्कृतीत यथायोग्य स्थान मिळाले अशी भावना झाली. त्या ‘अश्वपुराणा’ची ओळख करून घेण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या संग्राहकाची ओळख करून घेण्यास हवी. पुस्तक संकलित केले आहे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी...