Tag: बोर्डी
बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)
अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...
बालशिक्षणाच्या प्रणेत्या : ताराबाई मोडक ! (Tarabai Modak : Pioneer of Child Education)
ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत...