अब्दुल नदाफ यांनी दशावतार कलेमध्ये खास करून स्त्रीभूमिका साकारल्या. त्यांनी खरा कलाकार जातिधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही हे समाजाला दाखवून दिले. कलेसाठी त्यांची तळमळ पाहून, त्याबद्दलचे कौतुक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांत उमटते…
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे...