Tag: धानोरा
पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! (Paldoh School, 365 days a year!)
‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांमध्ये सुरू केल्या...
प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)
प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...