Tag: धनुष्यशास्त्र
ब्राह्मण कोण ?
इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती...