Tag: ताथवडा
किल्ले संतोषगड : शिवकालीन वैभव मिळेल?
फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजे ताथवडे गावातील ‘ताथवडा ऊर्फ संतोषगड’. ताथवडा हा डोंगरी किल्ला दहीवडीच्या वायव्येस बत्तीस किलोमीटर, तर फलटणच्या नैऋत्येस एकोणीस किलोमीटरवर आहे. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे- शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. त्यांपैकी महादेव डोंगररांगेतील कमी उंचीच्या एका टेकडीवर तो किल्ला उभा आहे...
उपेक्षित सीतामाईचा डोंगर
मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो...