सव्विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर हे होते. ते संमेलन 1941 साली सोलापूर येथे झाले. खांडेकर हे शिक्षकी पेशातील, सतत दारिद्र्याशी झुंज देत असलेले सात्त्विक प्रकृतीचे गृहस्थ होते. साहित्य हे मनात उच्च हेतू ठेवून लिहिले गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती...