Home Tags गाणे

Tag: गाणे

पाऊस पहावा‌ (Enjoying Rains)

पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात. भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...

प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर!

0
जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले संगीत अशी स्पष्ट आणि साधीसरळ व्याख्या संगीताची करता येईल. जगातील सगळेच संगीत तसे मधुर व भूरळ घालणारे, पण भारतीय शास्त्रीय संगीताला कुठेच तोड नाही. भारतीय संगीतातील लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचा थाट काही वेगळाच...