Home Tags क्रांतिसिंह नाना पाटील

Tag: क्रांतिसिंह नाना पाटील

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

महादू गेणू आढाव… मानवी हक्कांचा आवाज!

महादू गेणू आढाव या संघर्षवादी नेत्याने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. वादी असला तरी, त्याच्या आयुष्याचे नंदनवन करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यातील सद्हृदयतेचे दर्शन घडवतो...

फकिराच्या निर्मितीमागील शेतकरी हात!

प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला...