Tag: कुलगुरू
अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू
अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...
दत्तो वामन पोतदार – सांस्कृतिक पुरुष !
दत्तो वामन म्हणजे महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास ! दत्तो वामन हे मोठे सार्वजनिक कार्यकर्ते होते. त्यांचा महाराष्ट्रातील ऐंशी सार्वजनिक संस्थांशी कार्यकर्ता म्हणून विविध प्रकारे संबंध होता. म्हणूनच त्यांना ‘महाराष्ट्र पुरुष‘ असे संबोधले जाई. पोतदार यांनी जन्मभर ज्ञानयज्ञ केला. त्यामुळे त्यांना जन्मशिक्षक असेही म्हणत...
बी एम एम चे अधिवेशन : सोहळा अस्तित्वाचा
उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी एम एम). ती संस्था दर दोन वर्षांनी एखाद्या सबळ मंडळाला यजमानपद देऊन अधिवेशन म्हणजे सर्व मराठी मंडळांचे संमेलन घडवून आणते. तो सोहळा यावर्षी न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संयोजक संस्थेच्या वतीने साजरा होत आहे. प्रशांत कोल्हटकर हे अधिवेशनाचे निमंत्रक आहेत...