Tag: कुर्ला तालुका
प्रभातला ओढ कलात्मक सिनेमाची (Prabhat Strives for Better Cinema)
‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना 1968साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे.