ब्रिटिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांनी मिस मार्पल आणि हर्क्यूल पॉयरॉ अशा दोन स्वयंभू डिटेक्टिव पात्रांना रहस्यकथांच्या साहित्यविश्वात आणले. अर्ल स्टॅनली गार्डनर यांनी पेरी मेसन आणि पॉल ट्रेक वकील अशा दोघांना वकील आणि डिटेक्टिव म्हणून सादर केले.
मराठी शाळा मराठी भाषा शिकण्यासाठी अमेरिकेत ठिकठिकाणी सुरू झाल्या आहेत आणि त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली काही विशिष्ट नियमांनुसार सुरू आहेत. पण त्या शाळा नेमक्या कधी सुरू झाल्या, त्यांचा अभ्यासक्रम कसा ठरला? मराठी भाषेला अमेरिकेच्या शालेय शिक्षणात स्थान काय आहे?
ऋग्वेदाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. त्यांत प्रामुख्याने दोन गट पडतात. एका गटात युरोपीयन पंडित आहेत. ते मॅक्समुल्लरने दिलेला काळ (इसवी सनपूर्व 1200-1000) मान्य करतात. दुसऱ्या गटात प्रामुख्याने भारतीय विद्वान आहेत.
वर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्याचे. बुद्धांचे जीवन चारिकाप्रधान होते. गौतम बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करत.
गिरीश प्रभुणे यांना समाजशिक्षक हा पुरस्कार कृ.ब.तळवलकर ट्रस्टतर्फे 2012 मध्ये देण्यात आला. मी माझ्या ट्रस्टी मित्रांसोबत त्या निमित्ताने त्यांच्या चिंचवड येथील समरसता गुरूकुलम या शाळेला भेट दिली होती.
रहस्यकथा म्हटले, की मराठी भाषेच्या संदर्भात नावे आठवतात ती बाबुराव अर्नाळकर, नारायण धारप, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर यांची. परंतु त्या सर्वांच्या अगोदर मराठीत गोविंद नारायणशास्त्री दातार (1873-1941) यांनी काही रहस्यपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या.
‘हिंदुस्थानातील दुष्काळ’ या विषयावर निबंधस्पर्धा निर्णयसागर छापखान्याने 1903 मध्ये (एकशेअठरा वर्षांपूर्वी) आयोजित केली होती, त्यासाठी मोठे पारितोषिक घोषित केले होते.
‘परीटाचा दिवा’ हा शब्द कोकणात एकेकाळी प्रसिद्ध होता. तेव्हा परीट समाजाकडून दिवाळीत दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची गावोगावी मानली जात असे.
दलित साहित्याचे एक शिल्पकार आणि औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल.बा. रायमाने यांचे अल्पशा आजाराने 6 डिसेंबर 2020 ला निधन झाले. त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षे मृत्युसमयी होते.