काकाचीवाडी हे एक छोटेसे गाव सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात आहे. गावामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. स्वतंत्र ग्रामपंचायत, अंगणवाडी ते चौथीपर्यंत शाळा, बिरोबा मंदिर-हनुमान मंदिर व त्याची यात्रा, मोहरम यांसारखे सण अशा वैशिष्ट्यांनी युक्त असे हे गाव आहे.