केल्याने केशकर्तन ! – नंदन कालेकरांची किमया

0
2

नंदन सखाराम कालेकर या जेमतेम तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकलेल्या गृहस्थाने 1930 च्या काळात मोठी झेप घेतली. त्याने इंग्लंडला जाऊन केशकर्तन कलेचे आधुनिक शिक्षण घेतले आणि परत मुंबईला येऊन केस कापण्याचे दुकान थाटले ! नंदन कालेकर यांचे आईवडील लहानपणीच निवर्तले. त्यांना उदरनिर्वाहासाठी एका केशकर्तनालयात महिना दोन रुपये पगारावर नोकरी करावी लागली. योग असा, की तेथेच त्यांना वाचनाची आवड लागली ते किर्लोस्कर’ मासिकाचे वर्गणीदार 1931 साली झाले. त्या सुमारास त्यांचे मामा श्रीधरपंत देवजी माठे हे इंग्लंडला जाऊन आले होते. माठे हे कालेकर यांना त्यांच्या नाभिकव्यवसायासंबंधी कल्पना व सूचना देत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंदन यांनाही इंग्लंडला जावेसे वाटू लागले. मात्र त्यांना इंग्रजी येत नव्हते. तरीदेखील त्यांनी एक दिवस विलायतेला जाणाऱ्या एका मोठ्या बोटीवर हेअर ड्रेसरचे काम मिळवून हिंदुस्थानचा किनारा सोडला !

कालेकर यांनी पाठवलेले केशकर्तनासंबंधीचे लेखन किर्लोस्करांनी त्यांच्या किर्लोस्कर’ या मासिकात जून 1936 च्या आणि फेब्रुवारी 1937 च्या अंकांमध्ये प्रकाशित केले आहेत. कालेकर यांनी इंग्लंडहून परतल्यावर, 1944 साली नंदन केशभूषा-विद्यालय’ सुरू केले. त्याचे उद्घाटन आचार्य प्र.केअत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभात झाले. अशा तऱ्हेने केशकर्तनकेशभूषा आणि त्या कौशल्याची अनुषंगिक रूपे यांचा उगम मुंबईत झाला ! त्या उपक्रमाला सुशील कवळेकर.ल. सिलम (आमदार), अनंत काणेकरपां.वा. गाडगीळमामा वरेरकर, .गद्रे, र.गो. सरदेसाई अशांसारख्या ख्यातनाम व्यक्तींनी व साहित्यिकांनी पाठिंबा दिला. पुस्तकात कालेकर यांचा उल्लेख आचार्य म्हणून होतो. मात्र ती पदवी त्यांना कशी व कोठे मिळाली याचा निर्देश नाही.

कालेकर यांनी त्यांचे केशकर्तन कला: अर्थात केशभूषा शास्त्र आणि तंत्र हे पुस्तकही स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात, 1953 साली प्रकाशित केलेकालेकर पुस्तकात लिहितातकेशभूषेसंबंधाने मी जे जे पाहिले व अनुभवले ते ते आपल्या देशातील परिस्थितीप्रमाणे येथेही चालू करावे अशी तीव्र इच्छा मला झाली. ती इच्छाही मी किर्लोस्कर यांना कळवली. माझ्या कल्पनेला त्यांनी दुजोरा दिला. त्याचे दृश्य फळ म्हणून नंदन केशभूषा-विद्यालय सुरू केले.

त्या पुस्तकाला शं.वाकिर्लोस्कर यांचीच प्रस्तावना आहे. ते प्रस्तावनेत लिहितात, “खिशात कपर्दिक नसलेल्या व इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या एका गरीब न्हाव्याच्या मुलाने असा हव्यास धरावा हा वेडेपणा आहे असे कुणाला वाटले असते. पण त्याची क्षिती न बाळगता या मुलाने त्याची धडपड चालू ठेवली आणि इच्छा आहे तेथे मार्ग सापडतो’ या म्हणीप्रमाणे तो विलायतेला गेलादेखील !”

कालेकर यांनी त्यांच्या पुस्तकात व्यापक अशी माहिती दिली आहेत्यात अद्भुत अशा विस्मयकारक गोष्टी सांगितल्या आहेत – डोक्यावरील केसांपेक्षा गालावरील दाढीचे केस हे चौपट दाट असे, एक चौरस इंच जागेत सातशे-आठशे केस असतात; तर डोक्यावरील सर्व केसांची संख्या ही एक लक्ष बत्तीस हजार असते. कालेकर यांनी त्यांची अशी वर्णने संदर्भ व चित्रांसहित दिली आहेत. कालेकर पुस्तकात केवळ तांत्रिक सूचना देऊन थांबत नाहीत तर; त्यांनी काय करावे व काय करू नयेगिऱ्हाईकांशी कसे वागावेदुकानाची मांडणी कशी करावी अशा विपणन व्यवहार व वर्तणूकविज्ञान या शास्त्रातील सूचनाही केल्या आहेत.

केशकर्तन  दाढी करणे यासाठी लागणारी उपकरणे – वस्तराकात्रीब्रश -त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीवस्तरा चालवण्याची रीत, साधी कात्री व वस्तरा यांनी केस कापण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीटप्पे. हत्यारे कशी चालवावीवस्तऱ्याला धार कशी लावावी (धार करण्याचा चामड्याचा पट्टा व दगड यांची काळजी कशी घ्यावी आणि कोणता पर्याय अधिक श्रेयस्कर) ह्या आणि इतर अशा अनेक गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत.

कालेकर सांगतातकी केशसंवर्धन व केशरचनाह्या दोन्ही कष्टसाध्य अशा कला आहेत. इतर कला शिल्पकलाचित्रकला- ह्या जशा विशिष्ट शास्त्र आहेततसेच ह्या कलेचेही आहे. भारतात ह्या शास्त्राला कोणी महत्त्व दिले नव्हते, पण काळ बदलला. समाजाचे व समाजाच्या घटकांचे विचार बदलत चालले. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे नाभिक समाजाबद्दल सुशिक्षितांत आढळून येणारी आस्था.

कालेकर पुस्तकातील निवेदनात लिहितात, नाभिक समाजाबद्दल व त्या समाजाने सांभाळलेल्यापोसलेल्या व वाढवलेल्या केशकर्तन आणि केशभूषा ह्या कलांविषयी प्रतिष्ठितांना पूर्वी फारसे महत्त्व वाटले नाहीह्या दोषाचे खापरएकट्या उच्चवर्णीयांच्या माथी मारणे असमंजसपणाचे ठरेल. ती आपलीही (नाभिक समाजाची) चूक आहे. इतरांच्या नजरेला कलेचे महत्त्व व कौशल्य आणून देण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. मी हे पुस्तक त्याच उद्देशाने लिहिण्यास घेतले.कालेकर यांनी हे पुस्तक नाभिक व्यवसायातील दिवंगत, वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील व्यवसाय बंधूंस अर्पण केले आहे. कालेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून त्यांना व्यवसायाविषयीची असलेली आच जाणवते. बारीकसारीक गोष्टींचा त्यांनी केलेला विचार लक्षात येतो.

कालेकर यांनी पुस्तकात वा.गोआपटे यांच्या एका लेखाचा उल्लेख केला आहे –मनोरंजन मासिकाच्या एका अंकात प्राचीन संस्कृत ग्रंथाच्या आधारे स्त्रियांच्या भांगांचा त्रोटक इतिहास देताना त्यांनी हे सिद्ध केले आहेकी भांग पाडणेविविध प्रकारच्या वेण्या गुंफणे, अंबाडे-बुचडे बांधणे ही केशभूषा आजकालची नसून फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. अथर्व वेदात एक मंत्र आहे (9-133-37), त्यात देवापुढे असे मागणे केले आहेकी खूप लांब व दाट केसांनी आमची डोकी झाकली जावीत.

कोलंबिया विद्यापीठाला पीएच डी या पदवीसाठी 2020 मध्ये एक प्रबंध सादर झाला होता- Reimagining the Modern Hindu self- Caste, untouchability and Hindu Theology in Colonial South Asia-1898-1948 by Rahul Sarwate – कालेकरांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा घेतली गेली. त्यात पृष्ठ 140-141 वर कालेकर यांचा उल्लेख आहे. “किर्लोस्कर उद्योगसमूहाने उत्कर्ष मंडळ स्थापन करून यशस्वी झालेल्या उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात विविध जातींना जोडणारा पूल बांधावा आणि सामर्थ्यशालीआधुनिककार्यक्षम व तंत्रदृष्ट्या प्रगत राष्ट्र निर्मावे असे अभिप्रेत होते. ह्या मंडळामुळेकालेकर यांच्यावर प्रभाव पडला होता तो भांडवलवादी आदर्शाचा. त्या आदर्शाचा पुरस्कार किर्लोस्कर यांनी केला होता.” (पुस्तकाची पीडीएफ सोबतच्या लिंकवर वाचण्यास मिळेल.)

 मुकुंद वझे 9820946547 vazemukund@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here