न्यू जर्सीचे डॉ. प्रकाश व अलका लोथे वैद्यकीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी त्यांनी पुढे न्यूझीलंडचा दौरा करायचे ठरवले. त्या दौ-यात फिन्सलंड या शहरी त्यांना सरदारजीचे एक रेस्टॉरंट दिसले. स्वाभाविकच तेथे जाऊन खानपान केले. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये त्यांना जी काही पेंटिंग दिसली त्यामध्ये बाजीराव मस्तानी यांचे एक चित्र होते. डॉ. लोथे यांनी मालकास हे चित्र कोणाचे आहे, हे ठाऊक आहे का? असे विचारले. मालकाला ते ठाऊक नव्हते, डॉ. लोथे यांनी सरदार मालकाला बाजीराव-मस्तानीची गोष्ट सांगितली तेव्हा तोही रोमहर्षित झाला. त्याने डॉ. लोथे यांना विनंती केली, की तुम्ही मला ही गोष्ट थोडक्यात लिहून द्या. मालकाने डॉ. लोथे यांची गोष्ट टाईप करून घेतली व त्या पेंटिंग शेजारी चिटकवून टाकली. डॉ. लोथे यांच्या मनात आले, की काय ही बाजीराव-मस्तानीची कहाणी आहे ! ती ऐकावी त्याला वेड लावते.
(डॉ. लोथे यांनी कथन केलेला प्रसंग)
—————————————————————————–