दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा असतो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा का असेना उत्सवात त्या गोष्टी आड येत नाहीत आणि येण्यासही नकोत. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींनुसार दिवाळी त्यांना का भावते/आवडते त्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या सणाचे महात्म्य वेगळे आहे. ते स्थानपरत्वे बदलते का?
कोविड-19 च्या प्रभावाने सारी जीवनाची गती मार्च 2020 पासून थांबली आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, प्रशासन आणि त्यामुळे नागरिकांची जगण्याची गती मंदावली आहे. कोविड-19 ही आपत्ती नैसर्गिक वा अनैसर्गिक असे रूढ अर्थाने सांगता येणार नाही.