केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत.