प्रत्येक व्यक्तीची तिच्या गावची नदी ही मोठी आठवण असते. भले ती नदी छोटी असो नाही तर मोठी, आटलेली असो अगर वाहणारी; नदी असणारी गावे किती सुंदर आणि किती भाग्यवान!
रणजित डिसले यांनी क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवली! त्यांचे नाव महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात काही वर्षांपासून गाजत आहे. त्यांना युनेस्को आणि वार्की फाऊंडेशन यांच्यातर्फे जागतिक दर्ज्याचा सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार (2020) मिळाला.
मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंची आत्मचरित्रे लिहिण्यावरच भर अधिक होता.
ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.
र्मनीचा हुकूमशहा हिटलर याची भक्त असलेल्या स्त्रीने हिटलरच्या स्मृती जागवण्यासाठी तो जेथे जेथे गेला तेथे तेथे जाऊन त्या प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे! हिटलरची आम लोकांना माहिती आहे ती त्याने केलेल्या ज्यू लोकांच्या हत्याकांडामुळे.
व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले.
अमेरिकेत 1969 साली स्थापन झालेलं 'शिकागो महाराष्ट्र मंडळ' हे नॉर्थ अमेरिकेतील पहिले महाराष्ट्र मंडळ होय. ऑक्टोबर, 2019 मध्ये त्या मंडळाच्या कार्यकारिणीने गोल्डन जुबिलीचा तीन दिवसीय कार्यक्रम आखला होता.
पुण्याच्या अदिती देवधर यांनी ‘ब्राऊन लीफ’ हे आगळेवेगळे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. चार हजार लोक त्यात जोडले गेले आहेत. तो तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार आहे. सत्प्रवृत्त माणसे एकत्र येऊन काम करू शकतात याचे ‘ब्राऊन लीफ’ हे उदाहरण आहे!
नदीचे पुनरुज्जीवन सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही! तोच विचार मनात ठेवून आम्ही जीवितनदी संस्थेतर्फे, 'दत्तक घेऊया नदीकिनारा' ही योजना 2017 साली सुरू केली.
पुण्याजवळचे पानशेत येथील धरण 12 जुलै 1961 रोजी फुटले. ते मुठेची उपनदी अम्बी हिच्यावर त्यावेळी नुकते बांधले होते. ते खडकवासला साखळी योजनेतील धरण असल्याने, पानशेत धरण रिकामे होऊ लागल्यावर ते पाणी खडकवासला धरणात जमा झाले.