‘जीवना’सह सहजीवन
माधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...
सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!
सूत्रसंचालक पदाचे महत्त्व हे सर्वप्रथम ठसवले ते सुधीर गाडगीळने. तोपर्यंत कार्यक्रमात कधी निवेदन आले तर ते निव्वळ अनुक्रमाणिका-वाचन असायचे. सुधीरने त्या शुष्क निवेदनात त्याच्या सदा प्रफुल्लित चेहऱ्याने आणि ठसठशीत आवाजाने जिवंतपणा आणला. सुधीरने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यक्रमात निवेदकाला वक्त्याइतके महत्त्व आणून दिले...
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत...
मन्मनचे निरागस कर्मयोगी मधुकर गोखले (Madhukar Gokhale)
माझा सुहृद कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा, “श्रीकांत, तू ‘तळवलकर ट्रस्ट’च्या ‘अनुकरणीय उद्योजक’ पारितोषिकासाठी ‘मन्मन’च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा...
मला स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण...
‘‘मला, मी स्वतः कलाकार असलो तरी स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्याची इच्छा आहे.’’...
मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर
‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.
अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
हौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो – अचला जोशी
‘‘पूर्वीच्या एकत्रपणे नांदत्या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्य नांदतं असायला हवं. त्यामध्ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्हणजे आपल्याला...
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
माझ्या आयुष्याचा अर्थ – दिनकर गांगल यांची मुलाखत
‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व...
व्ही. शांताराम वेबसाइटचे उद्घाटन
“‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पात जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाइट बनत आहेत. त्यातील तीन आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी व्ही. शांताराम यांच्यासंबंधीची वेबसाइट खुली होत आहे. मला फाउंडेशनचे हे कार्य खूप मोठे वाटते. त्यामधून गेल्या शतकातील मराठीजनांचे भाव आणि विचारविश्व प्रकट होणार आहे. फाउंडेशनच्या या कामात मी सहभागी होईनच; परंतु प्रत्येक सुबुद्ध मराठी माणसाने या कामी हातभार लावला पाहिजे.” असे उद्गार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेश’च्या महाभूषण प्रकल्पातील चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या वेबसाइटचे उद्घाटन ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून साधण्यात आले...