त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)
कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत...
व्ही. शांताराम वेबसाइटचे उद्घाटन
“‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या महाभूषण प्रकल्पात जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाइट बनत आहेत. त्यातील तीन आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी व्ही. शांताराम यांच्यासंबंधीची वेबसाइट खुली होत आहे. मला फाउंडेशनचे हे कार्य खूप मोठे वाटते. त्यामधून गेल्या शतकातील मराठीजनांचे भाव आणि विचारविश्व प्रकट होणार आहे. फाउंडेशनच्या या कामात मी सहभागी होईनच; परंतु प्रत्येक सुबुद्ध मराठी माणसाने या कामी हातभार लावला पाहिजे.” असे उद्गार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेश’च्या महाभूषण प्रकल्पातील चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या वेबसाइटचे उद्घाटन ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून साधण्यात आले...
सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?
‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते...
माझे अलिबाग
एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग. नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची... म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी... असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती...
अलिबागचा गोटीचा सोडा
बेने इस्त्राईल समाजाची काही कुटुंबे अलिबाग परिसरात राहिली होती. डेव्हीड कुटुंब हे त्या बेने इस्त्राईल समाजाचे. ते तिघे भाऊ होते आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहत. त्यांचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय होता. तेथील मोकळ्या जागेत त्यांनी ‘सोडा वॉटर’ फॅक्टरी टाकली होती. त्याचे एक दुकान पोयनाडजवळच्या पळी गावाच्या फाट्यावर आहे. त्या सोड्याची लज्जत ज्यांनी पूर्वी अनुभवली आहे, ती मंडळी तेथे गाडी हमखास थांबवून त्याचा आस्वाद घेताना दिसतात. चोंढीनाक्यावरही जेथून कनकेश्वरला जाणारा फाटा फुटतो तेथेही डेव्हीडची फॅक्टरी होती असे आठवते...
नरसिंग महाराजांच्या नाना लीला
अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत. त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबाईंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते...
गजानन महाराज – नरसिंग महाराज स्नेहबंध !
महाराजांच्या घरी श्रीमंती होती. त्यांच्याकडे मूळ गावी शेकडो एकर जमीन होती. पुढे ते आकोटला आले व आकोटचे नरसिंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. गजानन महाराज हे नरसिंग महाराज यांना त्यांचे बंधू मानत असत. ते त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांना समवेत घेऊन आकोटला नरसिंग महाराज यांना भेटण्यास येत असत. भास्कर महाराज हे नरसिंग महाराज यांचे पूर्वीचे नातेवाईकच होते. नरसिंग महाराज आकोट जवळच्या अरण्यात एकांतवासात राहात असत. तेथे मोठमोठे वृक्ष असल्याचे वर्णन त्याच ग्रंथात व त्याच अध्यायामध्ये आहे...
संगमनेरची सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था (आठ कंदील ते एलइडी लाईट)
संगमनेरच्या नगरपालिकेने कामकाज 1860 मध्ये सुरू केले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एकेक प्रगती सुरू झाली. गाव अगदी छोटे असल्याने गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून, तेथे लाकडी खांब 1860 साली रोवले गेले. त्या खांबांवर आठ कंदील लावण्यात आले. रोज संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन, त्या कंदिलाची काच पुसून तेलपाणी करी आणि कंदील पेटवून जात असे. लोकांना त्या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटे...
बकुळफुलांचा अक्षयगंध… अक्षयरंग… (Blossoming Bakul)
बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत...