रस्त्यावर पंच्याऐंशी लिंबे रांगेत लावून ठेवलेली होती. उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उत्सुकता होती. तेवढ्यात सूरजचे तेथे आगमन झाले. त्याने हातात दांडपट्टा घेऊन शरीराची लयबद्ध हालचाल करत एका मिनिटांत चौर्याऐंशी लिंबांचे प्रत्येकी दोन असे तुकडे केले. त्यांचा खच रस्त्यावर पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते दृश्य पाहून टाळ्या, शिट्या आणि ‘जयभवानी! जय शिवाजी!!’चे नारे सुरू झाले. सगळे थक्क करणारे होते! सूरजच्या त्या अनोख्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली! त्याचबरोबर त्याला ‘प्राइड ऑफ नेशन’ हा किताबही देण्यात आला...