न्यूझीलंडमध्ये मस्तानी (Mastani in New Zealand)

न्यू जर्सीचे डॉ. प्रकाश व अलका लोथे वैद्यकीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी त्यांनी पुढे न्यूझीलंडचा दौरा करायचे ठरवले. त्या दौ-यात फिन्सलंड या शहरी त्यांना सरदारजीचे एक रेस्टॉरंट दिसले. स्वाभाविकच तेथे जाऊन खानपान केले. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये त्यांना जी काही पेंटिंग दिसली त्यामध्ये बाजीराव मस्तानी यांचे एक चित्र होते...

प्रतीकचा सांभाळ हीच स्मिताची ओढ !

‘इन्साफ का तराजू’ने थोडेफार नाव कमावलेल्या राज बब्बरने ‘आज की आवाज’मध्ये त्याची नायिका झालेल्या स्मिताला जाळ्यात अडकावले. स्मितानेदेखील त्या काळात कोणाचे मत जुमानले नाही, ती होतीच तशी बंडखोर ! लग्न झालेला संसारी पुरुष तिने निवडला. ती दोघे ‘लिव्ह इन’मध्ये 1980 च्या दशकात राहत होते यावरून त्यांच्या बेफिकीर आणि धाडसी वृत्तीची प्रचीती यावी...

गजानन महाराज – नरसिंग महाराज स्नेहबंध !

0
महाराजांच्या घरी श्रीमंती होती. त्यांच्याकडे मूळ गावी शेकडो एकर जमीन होती. पुढे ते आकोटला आले व आकोटचे नरसिंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. गजानन महाराज हे नरसिंग महाराज यांना त्यांचे बंधू मानत असत. ते त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांना समवेत घेऊन आकोटला नरसिंग महाराज यांना भेटण्यास येत असत. भास्कर महाराज हे नरसिंग महाराज यांचे पूर्वीचे नातेवाईकच होते. नरसिंग महाराज आकोट जवळच्या अरण्यात एकांतवासात राहात असत. तेथे मोठमोठे वृक्ष असल्याचे वर्णन त्याच ग्रंथात व त्याच अध्यायामध्ये आहे...

मर्ढेकर आणि लागू

कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…