आरेमध्ये झाडेतोड झाली… पण मेट्रोचा मार्ग मोकळा होऊन गेला !
आरे वसाहतीमधील झाडे आणि मुंबई मेट्रोची कारशेड यांवरून मुंबईकरांमध्ये दोन तट पडून गेले काही आठवडे चांगलीच जुंपली होती. काही लोकांनी उच्च न्यायालयात तीन-चार मुद्दे...
पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
विलास शहा – कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण वाचनालय चळवळीचे अध्वर्यू , कत्तलखान्याला निघालेल्या तब्बल सतरा लाख मुक्या पशूंना त्यांच्या ‘टीम’च्या सहकार्याने जीवनदान देणारे गांधीवादी समाजसेवक, साने गुरुजींच्या सहवासात...
‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
कासव संशोधनातील नवे युग ! (New Era of Turtle Research)
कासव संशोधनाला नवी दिशा देणारा एक प्रयोग 25 जानेवारी 2022 रोजी कोकणात करण्यात आला. तो म्हणजे कासवांनी घरटी तयार केल्यावर त्यांना उपग्रह टॅगिंग करण्याचा ! त्या दिवशी, प्रथमच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वेळास येथे प्रथमा नावाच्या कासवाला व दापोलीतील अंजर्ले येथे सावनी नावाच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले...
वृंदावन बाग – काऊ क्लब आणि बरेच काही!
चंद्रकांत भरेकर, राहणार भूकुम, तालुका मुळशी. त्यांचे ‘वृंदावन फार्म’ पुणे शहरापासून जेमतेम दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. ‘वृंदावन फार्म’ म्हणजे एका छत्राखाली किती वेगवेगळे प्रयोग...
वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था
'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....
शंकर खाडे यांचा बेडगला मुक्त गोठा
मी दुग्धव्यवसायात विविध पदांवर कामे पस्तीस-छत्तीस वर्षें करून सेवानिवृत्त झालो आहे. मी मला सेवानिवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम जनावरांच्या मुक्त गोठ्यात गुंतवली आहे. मला त्या...
दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)
दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...