कोकणातील नवान्न पौर्णिमा
कोकणात घराघरातून साजरा होणारा एक सण म्हणजे ‘नवान्न पौर्णिमा’. नव्याची पौर्णिमा. ‘नवान्न’ म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार...
वसुबारस (Vasubaras)
वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते...
वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
देव दीपावली (देवदिवाळी)
‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. केशव ही त्या महिन्याची...
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)
शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे...
बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक...
रांगोळी – पारंपरिक संस्कृती
‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)
वसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते...
टिप्परघाई – वडांगळी गावचा शिमगा
शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...