दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)

5
दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाई–म्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. #चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा...

लक्ष्मीपूजन (Laxmipoojan)

केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत.

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते.

अभ्यंगस्नान (Abhyangsnan)

अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे.

महापुरुषाचा मान ! (Diwali At Rajapur)

दसरा हा सण म्हणजे नवरात्रीच्या सणाचा समारोप आणि दिवाळीच्या तयारीची सुरुवात! साधारणपणे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून ‘दिवाळीचं काय काय कसं कसं करायचं' याच्या चर्चा गावातील महिलांमध्ये सुरू होतात.

धनत्रयोदशी (Dhanatrayodashi)

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात.

वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

आमच्या कोपरगावची दिवाळी (Diwali At Kopargaon)

कोपरगाव हा प्रगत शेतीने संपन्न अहमदनगर जिल्ह्यातील तालुका. तेथील अर्थकारण शेती - विशेषतः ऊसाची शेती, साखर कारखाने आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय संस्थांशी निगडित आहे.

पौर्णिमेपर्यंत सण (Diwali At Latur)

या ओळी आठवतात आणि दिवाळीच्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. सगळ्या सणांमध्ये आतुरतेने वाट पाहण्यास लावणारा, उत्साह वाढवणारा दिव्यांचा हा सण. मराठवाड्यात दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.

दिवाळीनिमित्त लेखनाचे आवाहन (Appeal to Write About Diwali)

2
दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा असतो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा का असेना उत्सवात त्या गोष्टी आड येत नाहीत आणि येण्यासही नकोत. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींनुसार दिवाळी त्यांना का भावते/आवडते त्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या सणाचे महात्म्य वेगळे आहे. ते स्थानपरत्वे बदलते का?