युवराज पाटील
लातूरची येळवस… अन् वलग्या वलग्या सालम पलग्या
येळवस म्हणजेच वेळा अमावस्या. तो सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मानला जातो. तो पुराणात किंवा इतिहासात नाही, मात्र त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो सण 2024 साली 11 जानेवारी रोजी आला तेव्हा लातूर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती ! त्यामुळे ती वेळा आमावस्या धुमधडाक्यात साजरी झाली. शेताशेतांत माणसांची भरती आली ! वेळा आमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. घरात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग असा सगळा रानमेवा जमा झालेला असतो...