Home Authors Posts by वृंदा देशपांडे-जोशी

वृंदा देशपांडे-जोशी

1 POSTS 0 COMMENTS
वृंदा देशपांडे-जोशी या संभाजीनगरच्या सरस्वती भुवन महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत. त्या लेखक-ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची ललित-अभ्यासपूर्ण मुलांसाठी अशी वेगवेगळी पाच पुस्तके प्रकाशित आहेत. त्या योगरहस्य, जागर स्वातंत्र्याचा, प्रासंगिक हे ब्लॉग आणि पस्तुरी हा युट्यूब चॅनेल नियमित चालवतात. त्या मुख्यतः साहित्य, शैक्षणिक व संशोधनपर संस्थांसाठी सदस्य व कार्यकर्ता म्हणून काम करतात.

मराठी भाषासंस्कृती धोक्यात (Marathi Language and Culture in Danger)

सुधीर रसाळ हे संभाजीनगरचे सुविख्यात समीक्षक. ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्यामुळे त्या घटनेची विशेष प्रशंसेने दखल घेतली गेली. संभाजीनगरच्याच ‘मुक्त सृजन’ संस्थेने रसाळ यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्या निमित्ताने वृंदा देशपांडे-जोशी यांनी ‘अमृताचे बोल’ नावाचा ब्लॉग लिहिला. त्यात रसाळ यांचे पूर्ण भाषण शब्दन् शब्द उद्धृत केलेच, पण स्वतःच्या भावनाही व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांनी वेगवेगळे चार मुद्दे मांडून त्यांचे भाषण नेमके व नेमक्या वेळात केले. त्यांतील मराठी भाषेसंबंधीचा मुद्दा प्रासंगिक महत्त्वाचा वाटल्याने तो येथे उद्धृत करत आहोत. अर्थात त्यातील निरीक्षणे चिरकालीन आहेत...