1 POSTS
विवेक चिंतामण उगलमुगले हे मूळ सिन्नरचे. सध्या त्यांचे वास्तव्य नाशिकला असते. ते महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागा(नाशिक)मधून फेब्रुवारी 2024 मध्ये सेवानिवृत्त झाले. ते कविता व ललित लेखन करतात. त्यांचे सात काव्यसंग्रह, एक व्यक्तिचित्र संग्रह, चार बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांना तिफन पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना गावाकडची माणसे, शेतीमातीविषयी विशेष आस्था व प्रेम आहे. ते नाशिकच्या दोन ग्रंथालयांचे पदाधिकारी आणि व्यासपीठ या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आहेत.