1 POSTS
विश्वास वसेकर हे लेखक, संपादक आणि मराठीचे माजी प्राध्यापक आहेत. त्यांनी परभणी येथील नूतन महाविद्यालयात पस्तीस वर्षे अध्यापन केले. ते महाराष्ट्र शासनाच्या 'जीवन शिक्षण' मासिकाच्या संपादक मंडळात आणि चित्रपट सल्लागार समितीत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी किस्त्रीम, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या दिवाळी अंकांचे सहाय्यक संपादक म्हणूनही काम केले. त्यांची कविता, ललित गद्य, विनोद, विडंबन, समीक्षा, उर्दू साहित्य, बालसाहित्य, कादंबरी अशी बावन्न पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कारही मिळाला आहे.