1 POSTS
विष्णु यादव हे रिझर्व बँकेचे निवृत अधिकारी. त्यांनी स्थानीय लोकाधिकार समिती तसेच कामगार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे एकांकिका स्पर्धांत लहानमोठ्या भूमिका केल्या आहेत. त्यांनी काही हिंदी लघु एकांकिकांचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या कथा, कविता, लेख विविध दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या लेखांची पाच इ-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा 'अशा व्यक्ती ... अशा आठवणी’ हा लेखसंग्रह प्रकाशित आहे. त्या लेखसंग्रहाला सर्वद फाऊंडेशन या संस्थेचा राज्यस्तरीय स्टार साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात...